Showing posts with label मराठी निबंध. Show all posts
Showing posts with label मराठी निबंध. Show all posts

Sunday, October 25, 2020

दिवाळी मराठी निबंध || Diwali essay in Marathi || दिवाळी/दीपावली निबंध सोप्या शब्दांत

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीपावली या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.


दीपावली || दिवाळी ( निबंध )

भारतातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण आहे.हिंदू दिनदर्शिकेनुसार दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यात येतो.या सणास दीपोत्सव असेही म्हटले जाते.हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दीपावली/दिवाळी हा सण साजरा करण्यामागे अनेक प्राचीन कथा आहेत त्यापैकीच एक कथा ती अशी की
खूप वर्षांपूर्वी अश्विन शुद्ध दशमीस भगवान श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून आणि 14 वर्षांचा वनवास संपवून पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत प्रवेश केला होता तेव्हा त्यांचे स्वागत अयोध्येतील नागरिकांनी दिव्यांच्या रोषणाईने केले होते.म्हणूनच या सणाला प्रकाशांचा म्हणजे दीपोत्सव असे म्हटले जाते.

दिवाळीची तयारी दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच करण्यात येते.सर्वजण आपला परिसर,घरे,दुकाने स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतात.घरांना विविध आकर्षक रंगानी रंगवून सजविण्यात येते.दिवाळी या सणानिमित्त विविध वस्तूची,कपडे,गोड पदार्थ,खेळणी,आकाश कंदील इत्यादी वस्तूंची खरेदी करण्यात येते.बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप येते.

दिवाळी हा सण प्रामुख्याने 5 दिवस साजरा केला जातो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय.या दिवशी गाईची आणि पाडसाची पूजा केली जाते.त्यांना पुरणपोळी व इतर पदार्थ खायला दिले जातात.दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी होय.या दिवशी धनाची देवी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते.दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी होय.याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता.या दिवशी भल्या पहाटे स्नान करणे शुभ मानले जाते यालाच अभ्यंगस्नान असे म्हटले जाते.दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मी-कुबेर यांचे पूजन होय.या दिवशी श्रीगणेश आणि सरस्वती देवीचीही पूजा केली जाते. हा दिवाळीचा मुख्य दिवस होय.या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये, अंगणात सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढण्यात येते,दिव्यांची सजावट केली जाते,मोठ-मोठे आकाशकंदील लावले जातात. यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय होतो.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर व्हावा म्हणून ज्योती,दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो.दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा,गोवर्धन पूजा आणि भाऊबीज होय. फार वर्षांपूर्वी याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत बोटावर उचलून भगवान इंद्रदेवाच्या रागातून पडणाऱ्या प्रचंड मोठ्या पावसापासून लोकांना वाचविले होते.या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आणि गाईची पूजा करण्यात येते.तसेच या दिवशी भाऊबीज साजरी करण्यात येते.या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊही आपल्या बहिणीला या दिवशी काही ना काही भेटवस्तू देतो.दीपावली पाडवा हा दिवस शुभ मानला जातो.या दिवशी लोक नवनवीन वस्तूची खरेदी करतात.अनेक महत्त्वाच्या कामाची सुरुवात देखील या दिवसापासून केली जाते.


दिवाळी हा असा उत्सव आहे जो प्रत्येक लोकांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण करतो. हा सणास वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

◆मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल...धन्यवाद...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

Wednesday, October 14, 2020

कोरोना वायरस मराठी निबंध || COVID-19 मराठी निबंध || Essay on Corona Virus in Marathi || Covid-19 essay in Marathi

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोरोना व्हायरस ( COVID-19 ) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.


कोरोना व्हायरस निबंध || COVID-19 मराठी निबंध


प्रस्तावना :-कोरोना वायरस हा अतिसूक्ष्म आणि घातक विषाणू आहे.या व्हायरसला COVID-19 म्हणूनही ओळखले जाते.हा व्हायरस सर्वप्रथम चीनमधील वुहान या शहरात आढळून आला होता.या व्हायरसला ' जागतिक आरोग्य संघटना ' (WHO) ने महामारी म्हणून घोषित केले आहे.हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे जगातील जवळपास 180 पेक्षा अधिक देशांमध्ये हा वायरस पसरलेला आहे.


              आजअखेर,या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरातून लाखोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पावले आहेत.या व्हायरसला रोखण्यासाठी आणि यावर औषध किंवा लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरातून संशोधन केले जात आहे.


◆COVID-19 कोरोना कसा पसरतो?


              COVID-19 हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे तो कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातून किंवा त्या त्याच्या खोकल्यातून व शिंकेतून निर्माण होणाऱ्या थेंबापासून तो इतरांमध्ये वेगाने पसरतो.


◆लक्षणे :-


ताप, कोरडा खोकला,डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास इत्यादी कोरोनाची सुरुवातीची सामान्य लक्षणे आहेत पण ही लक्षणे दिसायला सामान्य असली तरी ती प्राणघातक/जीवघेणी असू शकतात.हा विषाणू थेट व्यक्तीच्या शरीरावर परिणाम करतो त्यामुळे व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतो.


◆कोरोनाला रोखण्याचे उपाय :-

कोरोनाला रोखण्यासाठी आणि कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण खालील उपाय करू शकतो.


●नियमित मास्कचा वापर करणे.


●खोकताना किंवा शिंकताना हातरुमालाचा वापर करणे.


●नियमितपणे हातांना सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुणे.


●गरज नसताना सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळणे.


●सार्वजनिक ठिकाणी किमान 2 मीटरचे अंतर ठेवणे.



अशा प्रकारे आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण आपले कोरोनापासून संरक्षण करू शकतो आणि कोरोनाचा वाढत्या संसर्गाला रोखू शकतो.


●मित्रांनो,आशा करतो की तुम्हाला हा निबंधलेखनाचा नमुना आवडला असेल.


●धन्यवाद...

Tuesday, October 13, 2020

डॉ.एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो आज आपण भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी सुंदर असा निबंध पाहणार आहोत.


डॉ. एपीजे अब्दुल कलाम निबंध | Marathi Essay on Dr APJ.Abdul Kalam


डॉ. एपीजे.अब्दुल कलाम हे महान भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू मधील रामेश्वर जिल्ह्यातील धनुष्कोडी येथे झाला होता.त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनूलाब्दीन अब्दुल कलाम असे होते.त्यांच्या आईचे नाव अशिअम्मा असे होते.अब्दुल कलाम यांचे वडील स्थानिक मशिदीचे इमाम आणि रामेश्वरम येथे येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याचे आणि आणण्याचा व्यवसाय करत होते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम येथे झाले होते.ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.त्यांचे बालपण खूप कष्टात गेले होते.घरी हातभार लावण्यासाठी त्यांनी वर्तमान विकणे अशी अनेक कामे त्यांना करावी लागली.शालेय जीवनात गणित हा त्यांचा आवडता विषय होता.तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी BSC ची पदवी प्राप्त केली होती.तसेच मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून एरॉनॉटिक्स चा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला होता.त्यानंतर 'नासा'येथून त्यांनी एरोस्पेस टेक्नॉलॉजी चे शिक्षणही घेतले होते.

डॉ.एपीजे.अब्दुल कलाम यांचा सन 1958 ते 1963 या 5 वर्षांच्या कालावधीत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)संबंध आला होता.सन 1963 साली ते 'भारतीय अवकाश संशोधन संस्थेत' दाखल झाले होते.त्याकाळी मा.इंदिरा गांधीजी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला होता.डॉ.कलाम यांचा वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर भर होता.त्यांच्यामध्ये आपल्या सहकाऱ्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या विकासासाठी आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यात होती.क्षेपणास्त्र विकासातील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे 'भारताचे मिसाईल मॅन' म्हणून जगभर कौतुक झाले होते.

डॉ.कलाम हे मनाने खूप संवेदनशील आणि साधे होते.लहान मुलांशी गप्पा मारणे हा त्यांचा छंद होता.25 जुलै 2002 रोजी ते भारताचे 11 वे राष्ट्रपती झाले होते.राष्ट्रपती भवनावर आलेले ते प्रथम शास्त्रज्ञ होते.ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.डॉ.कलाम यांच्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण,पद्मविभूषण तसेच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

अशा या महान व्यक्तिमत्वाचे 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे निधन झाले.15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.


◆विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा...धन्यवाद...

Monday, October 5, 2020

माझा भाऊ मराठी निबंध | My Brother Marathi Essay

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत माझा भाऊ या विषयावर छोटासा आणि सुंदर निबंध...


माझा भाऊ (मराठी निबंध)

माझा भाऊ हा खऱ्या अर्थाने मला प्रत्येक बाबतीत साथ देणारा माझा साथीदार आहे.तो खूप प्रेमळ आणि खूपच शिस्तप्रिय आहे.माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे.त्याला मी प्रेमाने दादा म्हणून हाक मारतो.


दादा हा खूपच सरळ स्वभावाचा आहे.त्याला अजिबात खोटे बोललेले आवडत नाही.तो खूप कष्टाळू देखील आहे.तो आई-बाबांना शेतीच्या कामात खूप मदत करतो.माझा भाऊ नुकताच गेल्या वर्षी पदवीधर झाला आहे.तो जेवढा कष्टाळू आहे तेवढाच तो अभ्यासू आणि खूपच इमानदार देखील आहे.माझा गरीब आणि निराधार लोकांची सेवा देखील करतो.त्याला पुढे शिकून जिल्हाधिकारी व्हायचे आहे.


माझा भाऊ हा माझ्यासाठी फक्त भाऊ नाही तर तो माझा पाठीराखा आहे.तो नेहमी मला नवनव्या गोष्टी शिकवतो.आजच्या या धावपळीच्या युगात कसे जगायचे?याबाबत तो मला नेहमी मार्गदर्शन देतो.तो माझा दररोज अभ्यास घेतो.मला अभ्यासातील काही समजलं नसेल तर तो मला नीट समजावून देखील सांगतो.तो जसा हुशार आहे तसाच मी देखील अभ्यासात हुशार पाहिजे असे त्याला वाटते.

माझ्या दादाबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे पण मी नक्कीच सांगतो की माझा दादा हा माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे आणि तो मला खूप-खूप आवडतो.


तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल आणि जर हा निबंध आवडला असेल तर हा निबंध आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा...

धन्यवाद...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

Wednesday, September 30, 2020

माझा आवडता मित्र मराठी निबंध | My Best Friend Marathi Essay

नमस्कार मित्रांनो,आजच्या या ब्लॉगमध्ये आपण माझा आवडता मित्र या विषयावर सुंदर असा मराठी निबंध पाहणार आहोत.


माझा आवडता मित्र | My Best Friend

मला बरेच मित्र आहेत पण माझा आवडता मित्र सतीश आहे.तो खूप प्रेमळ आणि दयाळू आहे.त्याला मी प्रेमाने
सतू म्हणून हाक मारतो.तो देखील मला सोनू म्हणून हाक मारतो.तो खूप हुशार आहे.त्याला बोलायला खूप आवडते.वर्गामध्ये त्याला बोलका पोपट म्हणून चिडवतात पण तो सर्वांकडे दुर्लक्ष करतो.तो आमच्या वर्गाचा सेक्रेटरी देखील आहे.

सतीश हा एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे.तो परिस्थितीने गरीब असला तरी बुद्धीने खूप श्रीमंत आहे.
दरवर्षी तो वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो.तो सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे.तो विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतो.त्याचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे.

सतीशला गणित विषय खूप आवडतो.त्याला नेहमी गणितात 100 पैकी 90 च्या पुढे मिळतात.मला गणित हा विषय खूप अवघड वाटायचा पण सतिशच्या सहकार्याने मला अवघड वाटणारा विषय आता सोपा वाटू लागला आहे.आम्ही दोघे घरी अभ्यास करत असतो आणि तो मला अवघड गणित कसे सोडवायचे हे ही समजावून सांगतो.मलाही गणितात 100 पैकी 70 ते 75
पर्यंत गुण मिळतात.याचे श्रेय माझ्या मित्राला म्हणजे सतीशला जाते.

सतीश आणि मी नेहमी एकत्र शाळेला जातो आणि एकत्र घरी परत येतो.तो एखाद्या दिवशी वर्गात उपस्थित नसला तर मला शाळेत करमत नाही.शाळा सुटल्यावर आम्ही घरी आल्यावर 1 तासभर खेळतो.त्यानंतर तो घरी जातो.
आमच्या घराशेजारीच त्याचे घर आहे.तो हुशार असल्याने
आई मला त्याच्या घरी अभ्यास करण्यासाठी पाठवते.


सतीशला मोठे होऊन डॉक्टर बनण्याची इच्छा आहे.
तो भविष्यात त्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल अशी माझी
खात्री आहे.असा हा माझा मित्र सतीश मला खूप खूप आवडतो.त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा...धन्यवाद...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

माझे कुटुंब माझी जबाबदारी मराठी निबंध | Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझे कुटूंब माझी जबाबदारी या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.


माझे कुटुंब माझी जबाबदारी

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी करूया तयारी...
माझे कुटुंब माझी जबाबदारी...


कोरोना हा एक असा रोग ज्याने काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे.या रोगामुळे प्रत्येकाचे जीवन जगणे कठीण झाले आहे.या रोगामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.भारतात देखील या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.जेवढे कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी येत आहेत जवळपास तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे.यामुळे हा रोग जाणार कधी असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या.संपूर्ण भारतभर लॉकडाऊन करण्यात आले.पोलीस,डॉक्टर,नर्सेस,सफाई कर्मचारी अशा अनेक कोरोना योद्ध्यांनी मोलाचे योगदान दिले आणि अजूनही देत आहेत.यामुळे कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यास मदत झाली पण हा रोग संसर्गजन्य रोग असल्यामुळे हा रोग आता ग्रामीण भागामध्ये देखील पसरत चालला आहे.यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवी मोहीम सुरू केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही एक नवी मोहीम सुरू केली आहे.ही मोहीम 15 सप्टेंबर पासून 25 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.या मोहिमेमध्ये प्रत्येक गावचे सरपंच,शिक्षक,डॉक्टर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स असे अनेक घटक सहभागी होणार असून या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य चौकशी, आरोग्य तपासणी केली जाणार आहे.एक कुटुंब प्रमुख या नात्याने आपणास प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याबाबत खरी माहिती द्यायची आहे.इन्फ्रारेड मशीन द्वारे शरीराचे तापमान मोजण्यात येईल तसेच शरीरातील प्राणवायू (ऑक्सिजन) पातळीची नोंद देखील घेण्यात येणार आहे.कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे.

आपल्याला जर कोरोनाचा शेवट करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची तसेच स्वताचीदेखील जबाबदारीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.नियमित मास्कचा वापर करणे,समोरासमोर बोलणे टाळणे,गर्दीच्या ठिकाणी न जाणे,हात सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुणे,नियमित स्वच्छ कपडे घालणे,फळभाज्या, पालेभाज्या स्वच्छ धुणे,वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळणे अशा अनेक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तर चला या मोहिमेत सहभागी होऊया आणि कोरोनाला हद्दपार करूया...


मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा...

धन्यवाद...

Saturday, September 26, 2020

माझी आई निबंध ( सोप्या शब्दांत)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण 'माझी आई' या विषयावर सुंदर असा मराठी निबंध पाहणार आहोत.


माझी आई

माझ्या आईचे नाव ... आहे.ती खूप प्रेमळ,आणि शिस्तप्रिय आहे.माझी आई गृहिणी आहे.ती नियमित देवपूजा करते.आईला सकाळी लवकर उठण्याची सवय आहे आणि ती शिस्तप्रिय असल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीला देखील सकाळी लवकर उठण्याची सवय झाली आहे.घरातील सर्व काम आवरून आई ती मला शाळेत अगदी वेळेत पोहचविते.मला जेवणाचा डबा बनवून देते आणि मला शाळेत नेण्यासाठी देखील येते.

माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते.ती मला प्रेमाने...म्हणून हाक मारते. आईची ती हाक ऐकतच रहावीशी वाटते.मलाही माझी आई खूप आवडते.तिच्याशिवाय घरी मला मुळीच करमत नाही.आई माझ्याबरोबरच माझ्या घरच्यांचीदेखील काळजी घेते. माझ्या आईवर संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी आहे.माझे वडील घर सांभाळण्यास तिची मदत करतात.
 
शाळेतून जेव्हा ती मला घरी नेण्यासाठी येते तेव्हा ती शाळेच्या गेटसमोर उभी राहते आणि शाळा जेव्हा सुटते तेव्हा मला पाहून माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू उमटते.घरी गेल्यावर आई मला हात-पाय धुवायला सांगते आणि माझ्यासाठी चहा करते.यानंतर ती मला अभ्यास करायला सांगते.मला अभ्यासात काहीतरी समस्या आली तर मी माझ्या आईस सांगतो आई पटकन ती समस्या सोडवून टाकते.

माझी आई माझ्यासाठी खूप-खूप महत्त्वाची व्यक्ती आहे.ती माझ्यासाठी मायेची सावली आहे.आईला
आई म्हणून हाक मारल्याशिवाय मला चैन पडत पडत नाही.ती माझ्यासाठी सर्वात मौल्यवान व्यक्ती आहे.माझी आई खूप चांगले जेवण बनवते.तीने कोणताही पदार्थ बनवला तरी तो खूप जबरदस्त बनतो.घरातील प्रत्येकाला आईनेच बनवलेले जेवण आवडते.

अशी माझी आई मला खूप-खूप आवडते.

◆विद्यार्थी मित्रांनो,तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर   करा...धन्यवाद...


Tuesday, September 22, 2020

महात्मा गांधी

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी निबंध
पाहणार आहोत.


राष्ट्रपिता महात्मा गांधी

महात्मा गांधी हे भारतातील महान नेते,वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते.त्यांच्या जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील
पोरबंदर या शहरात झाला.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.गांधीजींच्या आईचे नाव पुतळीबाई होते.गांधीजींचे वडील पोरबंदर येथे दिवाण
होते.

गांधीजींनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले.त्यानंतर ते
उच्चशिक्षण घेण्यासाठी,कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे गेले.इंग्लंडमध्ये
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे त्यांनी वकिलीचे शिक्षण
घेतले.

गांधीजींनी सुमारे 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केले.तेथे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
गांधीजींना वर्णभेदाचा देखील अनुभव आला होता.तेथील
ब्रिटिश शासन भारतीय लोकांवर अन्याय करत होते.या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी अहिंसा या तत्वांचा उपयोग केला.गांधीजींनी तेथील भारतीय लोकांना त्यांचे नागरी अधिकार मिळवून देण्यासाठी या
अहिंसा सत्याग्रहाचा उपयोग केला.

भारतात आल्यानंतर गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य
देशाच्या सेवेसाठी वाहिले.गांधीजींनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता अशा समस्यांविरुद्ध आवाज उठविला.स्त्रियांना समान हक्क मिळावा,शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने केली.भारतीय
स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
इंग्रज सरकारविरुद्ध संघर्ष केला.गांधीजींच्या अथक संघर्षामुळे आणि हजारों स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश
गुलामीपासून स्वतंत्र झाला.

30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा...धन्यवाद....

माझी शाळा [ मराठी निबंध ]

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो या ब्लॉगमध्ये आपण
माझी शाळा या विषयावर सुंदर मराठी निबंध पाहणार आहोत.

माझी शाळा 

माझ्या शाळेचे नाव ( येथे तुमच्या शाळेचे नाव लिहा).माझी शाळा एक आदर्श शाळा आहे.
माझी शाळा एक प्राथमिक शाळा आहे.या शाळेत 1 ली पासून 7 वी पर्यंतचे वर्ग शिकवले जातात.या शाळेत जवळपास 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

माझ्या शाळेची वेळ सकाळी 11 ते 5 पर्यंत आहे.माझ्या शाळेची इमारत दुमजली आहे.शाळेचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका आहे.माझ्या शाळेत 6 शिक्षक आणि 3 शिक्षिका आहेत. सर्व  शिक्षक आणि शिक्षिका विद्यार्थ्यांची काळजी घेतात.आमचे शिक्षक शिक्षणाबरोबरच आम्हाला विविध खेळ,कला अशा विविध गोष्टींचे मार्गदर्शनही करतात.विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुंदर मैदानदेखील आहे.

माझ्या शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकांची सोय आहे.तसेच प्रत्येक शाळेमध्ये
पंख्याची सोयदेखील आहे.माझ्या शाळेत दररोज न चुकता शालेय पोषण आहार दिला जातो.शाळेस आकर्षक रंग दिलेला आहे.यामुळे शाळा खूप छान दिसते.माझ्या शाळेतील गरीब आणि गरजू मुलांना
शालेय गणवेश मोफत दिला जातो तसेच त्यांना मोफत
वह्या देखील दिल्या जातात.

माझी शाळा एक आदर्श शाळा आहे.या शाळेने आम्हाला खूप ज्ञान दिले आहे.या शाळेने अनेक आदर्श नागरिक घडविले आहेत आणि इथून पुढे देखील अनेक विद्यार्थ्यांना माझी शाळा घडवणार आहे.माझी शाळा मला खूप खूप आवडते.


मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा...

Tuesday, September 8, 2020

हिंदी,मराठी और अंग्रेजी भाषा में निबंध/भाषण पत्रलेखन

सूचना :- सभी विद्यार्थीयों से निवेदन हैं की यहाँ दिए गए निबंध,भाषण,कविता और पत्रलेखन को पढे़,समझें और अपने शब्दों में लिखने का प्रयास करें।

■धन्यवाद...

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...