Sunday, October 25, 2020

दिवाळी मराठी निबंध || Diwali essay in Marathi || दिवाळी/दीपावली निबंध सोप्या शब्दांत

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीपावली या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.


दीपावली || दिवाळी ( निबंध )

भारतातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण आहे.हिंदू दिनदर्शिकेनुसार दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यात येतो.या सणास दीपोत्सव असेही म्हटले जाते.हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दीपावली/दिवाळी हा सण साजरा करण्यामागे अनेक प्राचीन कथा आहेत त्यापैकीच एक कथा ती अशी की
खूप वर्षांपूर्वी अश्विन शुद्ध दशमीस भगवान श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून आणि 14 वर्षांचा वनवास संपवून पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत प्रवेश केला होता तेव्हा त्यांचे स्वागत अयोध्येतील नागरिकांनी दिव्यांच्या रोषणाईने केले होते.म्हणूनच या सणाला प्रकाशांचा म्हणजे दीपोत्सव असे म्हटले जाते.

दिवाळीची तयारी दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच करण्यात येते.सर्वजण आपला परिसर,घरे,दुकाने स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतात.घरांना विविध आकर्षक रंगानी रंगवून सजविण्यात येते.दिवाळी या सणानिमित्त विविध वस्तूची,कपडे,गोड पदार्थ,खेळणी,आकाश कंदील इत्यादी वस्तूंची खरेदी करण्यात येते.बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप येते.

दिवाळी हा सण प्रामुख्याने 5 दिवस साजरा केला जातो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय.या दिवशी गाईची आणि पाडसाची पूजा केली जाते.त्यांना पुरणपोळी व इतर पदार्थ खायला दिले जातात.दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी होय.या दिवशी धनाची देवी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते.दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी होय.याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता.या दिवशी भल्या पहाटे स्नान करणे शुभ मानले जाते यालाच अभ्यंगस्नान असे म्हटले जाते.दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मी-कुबेर यांचे पूजन होय.या दिवशी श्रीगणेश आणि सरस्वती देवीचीही पूजा केली जाते. हा दिवाळीचा मुख्य दिवस होय.या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये, अंगणात सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढण्यात येते,दिव्यांची सजावट केली जाते,मोठ-मोठे आकाशकंदील लावले जातात. यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय होतो.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर व्हावा म्हणून ज्योती,दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो.दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा,गोवर्धन पूजा आणि भाऊबीज होय. फार वर्षांपूर्वी याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत बोटावर उचलून भगवान इंद्रदेवाच्या रागातून पडणाऱ्या प्रचंड मोठ्या पावसापासून लोकांना वाचविले होते.या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आणि गाईची पूजा करण्यात येते.तसेच या दिवशी भाऊबीज साजरी करण्यात येते.या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊही आपल्या बहिणीला या दिवशी काही ना काही भेटवस्तू देतो.दीपावली पाडवा हा दिवस शुभ मानला जातो.या दिवशी लोक नवनवीन वस्तूची खरेदी करतात.अनेक महत्त्वाच्या कामाची सुरुवात देखील या दिवसापासून केली जाते.


दिवाळी हा असा उत्सव आहे जो प्रत्येक लोकांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण करतो. हा सणास वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

◆मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल...धन्यवाद...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

No comments:

Post a Comment

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...