◆नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधीजींविषयी सुंदर भाषण पाहणार आहोत.
आदरणीय प्राचार्य,सर्व शिक्षक आणि येथे उपस्थित माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आपण मला येथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.आज आपण महात्मा गांधीजींची 151वी जयंती साजरी करण्यासाठी येथे उपस्थित आहोत.या शुभ प्रसंगी त्यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी नम्र विनंती.
महात्मा गांधी म्हणजे एक असे महान व्यक्तिमत्त्व ज्यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी वाहिले.त्यांनी जे देशासाठी योगदान दिलेले आहे ते खूप अनमोल आहे.त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर येथे हिंदू परिवारात झाला होता.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते आणि गांधीजींचे वडील पोरबंदर,राजकोट येथे दिवाण होते.सन 1883 मध्ये वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला होता.
गांधीजींनी आपले सुरुवातीचे शिक्षण पोरबंदर आणि राजकोट येथे पूर्ण केले आणि पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले.युनिव्हर्सिटी कॉलेज,लंडन येथे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि ते बॅरिस्टर झाले.
गांधीजींनी आपल्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला होता.ते जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा तेव्हा तेथील ब्रिटिश शासन भारतीयांवर अन्याय करत होते.या अन्यायाचा बदल घेण्यासाठी त्यांनी अहिंसा तत्वाचा मार्ग स्वीकारला होता.अहिंसा मार्गाचा वापर त्यांनी तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला होता.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला होता.दांडी यात्रेतील मिठाचा सत्याग्रह,चले जावं चळवळ,असे अनेक सत्याग्रह त्यांनी केले.अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पण त्यांनी हार न मानता ब्रिटिशांविरुद्धची लढाई सुरूच ठेवली. त्यांच्या अथक संघर्षामुळे आणि हजारों स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला.
अशा या थोर स्वातंत्र्यसैनिकाचे 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले.नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली.
महात्मा गांधीजींच्या कार्याला आमचा कोटी-कोटी प्रणाम...
जय हिंद...जय भारत...वंदे मातरम...महात्मा गांधी की जय...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मित्रांनो, तुम्हाला हे भाषण आवडलं असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा...धन्यवाद...
No comments:
Post a Comment