माझा आवडता मित्र | My Best Friend
मला बरेच मित्र आहेत पण माझा आवडता मित्र सतीश आहे.तो खूप प्रेमळ आणि दयाळू आहे.त्याला मी प्रेमाने
सतू म्हणून हाक मारतो.तो देखील मला सोनू म्हणून हाक मारतो.तो खूप हुशार आहे.त्याला बोलायला खूप आवडते.वर्गामध्ये त्याला बोलका पोपट म्हणून चिडवतात पण तो सर्वांकडे दुर्लक्ष करतो.तो आमच्या वर्गाचा सेक्रेटरी देखील आहे.
सतीश हा एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे.तो परिस्थितीने गरीब असला तरी बुद्धीने खूप श्रीमंत आहे.
दरवर्षी तो वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो.तो सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे.तो विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतो.त्याचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे.
सतीशला गणित विषय खूप आवडतो.त्याला नेहमी गणितात 100 पैकी 90 च्या पुढे मिळतात.मला गणित हा विषय खूप अवघड वाटायचा पण सतिशच्या सहकार्याने मला अवघड वाटणारा विषय आता सोपा वाटू लागला आहे.आम्ही दोघे घरी अभ्यास करत असतो आणि तो मला अवघड गणित कसे सोडवायचे हे ही समजावून सांगतो.मलाही गणितात 100 पैकी 70 ते 75
पर्यंत गुण मिळतात.याचे श्रेय माझ्या मित्राला म्हणजे सतीशला जाते.
सतीश आणि मी नेहमी एकत्र शाळेला जातो आणि एकत्र घरी परत येतो.तो एखाद्या दिवशी वर्गात उपस्थित नसला तर मला शाळेत करमत नाही.शाळा सुटल्यावर आम्ही घरी आल्यावर 1 तासभर खेळतो.त्यानंतर तो घरी जातो.
आमच्या घराशेजारीच त्याचे घर आहे.तो हुशार असल्याने
आई मला त्याच्या घरी अभ्यास करण्यासाठी पाठवते.
सतीशला मोठे होऊन डॉक्टर बनण्याची इच्छा आहे.
तो भविष्यात त्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल अशी माझी
खात्री आहे.असा हा माझा मित्र सतीश मला खूप खूप आवडतो.त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा...धन्यवाद...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
No comments:
Post a Comment