Wednesday, September 30, 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी मराठी निबंध | Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझे कुटूंब माझी जबाबदारी या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.


माझे कुटुंब माझी जबाबदारी

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी करूया तयारी...
माझे कुटुंब माझी जबाबदारी...


कोरोना हा एक असा रोग ज्याने काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे.या रोगामुळे प्रत्येकाचे जीवन जगणे कठीण झाले आहे.या रोगामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.भारतात देखील या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.जेवढे कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी येत आहेत जवळपास तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे.यामुळे हा रोग जाणार कधी असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या.संपूर्ण भारतभर लॉकडाऊन करण्यात आले.पोलीस,डॉक्टर,नर्सेस,सफाई कर्मचारी अशा अनेक कोरोना योद्ध्यांनी मोलाचे योगदान दिले आणि अजूनही देत आहेत.यामुळे कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यास मदत झाली पण हा रोग संसर्गजन्य रोग असल्यामुळे हा रोग आता ग्रामीण भागामध्ये देखील पसरत चालला आहे.यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवी मोहीम सुरू केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही एक नवी मोहीम सुरू केली आहे.ही मोहीम 15 सप्टेंबर पासून 25 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.या मोहिमेमध्ये प्रत्येक गावचे सरपंच,शिक्षक,डॉक्टर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स असे अनेक घटक सहभागी होणार असून या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य चौकशी, आरोग्य तपासणी केली जाणार आहे.एक कुटुंब प्रमुख या नात्याने आपणास प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याबाबत खरी माहिती द्यायची आहे.इन्फ्रारेड मशीन द्वारे शरीराचे तापमान मोजण्यात येईल तसेच शरीरातील प्राणवायू (ऑक्सिजन) पातळीची नोंद देखील घेण्यात येणार आहे.कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे.

आपल्याला जर कोरोनाचा शेवट करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची तसेच स्वताचीदेखील जबाबदारीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.नियमित मास्कचा वापर करणे,समोरासमोर बोलणे टाळणे,गर्दीच्या ठिकाणी न जाणे,हात सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुणे,नियमित स्वच्छ कपडे घालणे,फळभाज्या, पालेभाज्या स्वच्छ धुणे,वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळणे अशा अनेक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तर चला या मोहिमेत सहभागी होऊया आणि कोरोनाला हद्दपार करूया...


मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा...

धन्यवाद...

No comments:

Post a Comment

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...