माझी शाळा या विषयावर सुंदर मराठी निबंध पाहणार आहोत.
माझी शाळा
माझ्या शाळेचे नाव ( येथे तुमच्या शाळेचे नाव लिहा).माझी शाळा एक आदर्श शाळा आहे.
माझी शाळा एक प्राथमिक शाळा आहे.या शाळेत 1 ली पासून 7 वी पर्यंतचे वर्ग शिकवले जातात.या शाळेत जवळपास 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
माझ्या शाळेची वेळ सकाळी 11 ते 5 पर्यंत आहे.माझ्या शाळेची इमारत दुमजली आहे.शाळेचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका आहे.माझ्या शाळेत 6 शिक्षक आणि 3 शिक्षिका आहेत. सर्व शिक्षक आणि शिक्षिका विद्यार्थ्यांची काळजी घेतात.आमचे शिक्षक शिक्षणाबरोबरच आम्हाला विविध खेळ,कला अशा विविध गोष्टींचे मार्गदर्शनही करतात.विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुंदर मैदानदेखील आहे.
माझ्या शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकांची सोय आहे.तसेच प्रत्येक शाळेमध्ये
पंख्याची सोयदेखील आहे.माझ्या शाळेत दररोज न चुकता शालेय पोषण आहार दिला जातो.शाळेस आकर्षक रंग दिलेला आहे.यामुळे शाळा खूप छान दिसते.माझ्या शाळेतील गरीब आणि गरजू मुलांना
शालेय गणवेश मोफत दिला जातो तसेच त्यांना मोफत
वह्या देखील दिल्या जातात.
माझी शाळा एक आदर्श शाळा आहे.या शाळेने आम्हाला खूप ज्ञान दिले आहे.या शाळेने अनेक आदर्श नागरिक घडविले आहेत आणि इथून पुढे देखील अनेक विद्यार्थ्यांना माझी शाळा घडवणार आहे.माझी शाळा मला खूप खूप आवडते.
मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा...
No comments:
Post a Comment