माझा भाऊ (मराठी निबंध)
माझा भाऊ हा खऱ्या अर्थाने मला प्रत्येक बाबतीत साथ देणारा माझा साथीदार आहे.तो खूप प्रेमळ आणि खूपच शिस्तप्रिय आहे.माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे.त्याला मी प्रेमाने दादा म्हणून हाक मारतो.
दादा हा खूपच सरळ स्वभावाचा आहे.त्याला अजिबात खोटे बोललेले आवडत नाही.तो खूप कष्टाळू देखील आहे.तो आई-बाबांना शेतीच्या कामात खूप मदत करतो.माझा भाऊ नुकताच गेल्या वर्षी पदवीधर झाला आहे.तो जेवढा कष्टाळू आहे तेवढाच तो अभ्यासू आणि खूपच इमानदार देखील आहे.माझा गरीब आणि निराधार लोकांची सेवा देखील करतो.त्याला पुढे शिकून जिल्हाधिकारी व्हायचे आहे.
माझा भाऊ हा माझ्यासाठी फक्त भाऊ नाही तर तो माझा पाठीराखा आहे.तो नेहमी मला नवनव्या गोष्टी शिकवतो.आजच्या या धावपळीच्या युगात कसे जगायचे?याबाबत तो मला नेहमी मार्गदर्शन देतो.तो माझा दररोज अभ्यास घेतो.मला अभ्यासातील काही समजलं नसेल तर तो मला नीट समजावून देखील सांगतो.तो जसा हुशार आहे तसाच मी देखील अभ्यासात हुशार पाहिजे असे त्याला वाटते.
माझ्या दादाबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे पण मी नक्कीच सांगतो की माझा दादा हा माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे आणि तो मला खूप-खूप आवडतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल आणि जर हा निबंध आवडला असेल तर हा निबंध आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा...
धन्यवाद...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
No comments:
Post a Comment