◆शाळेच्या फी माफीसाठी मुख्याध्यापक/प्राचार्य यांना पत्र लिहा.
प्रति,
मा. प्राचार्य
(शाळेचे नाव)
(शाळेचा पत्ता)
दिनांक :-
विषय:-शाळेच्या फी माफीसाठी प्राचार्यांना पत्र।
आदरणीय सर/मॅडम,
माझे नाव(तुमचे पूर्ण नाव) असून मी आपल्या शाळेत/विद्यालयात इयत्ता ( ) वीच्या वर्गात शिकत असून मी आपणास विनंती करू इच्छितो की माझे वडील एक मजूर/शेतकरी/असून त्यांचे आर्थिक उत्पन्न अत्यंत कमी आहे.त्यांचे जेवढे उत्पन्न आहे ते सर्व घरखर्चासाठी खर्च होतात. यातून काही पैशांची मुळीच बचत होत नाही.त्यामुळे माझे वडील माझी शाळेची फी भरण्यास असमर्थ आहेत.
मी एक हुशार आणि गुणवंत विद्यार्थी असून माझी पुढे शिकण्याची खूप इच्छा आहे.तरी आपण मला फी माफ करून सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती.यासाठी मी आपला सदैव आभारी राहीन.
आपला आज्ञार्थी
(तुमचे संपूर्ण नाव)
(इयत्ता :- )
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मित्रांनो,तुम्हाला हा पत्र लिहिलेला नमुना आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की Share करा...
धन्यवाद...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
No comments:
Post a Comment