Tuesday, October 13, 2020

डॉ.एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो आज आपण भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी सुंदर असा निबंध पाहणार आहोत.


डॉ. एपीजे अब्दुल कलाम निबंध | Marathi Essay on Dr APJ.Abdul Kalam


डॉ. एपीजे.अब्दुल कलाम हे महान भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू मधील रामेश्वर जिल्ह्यातील धनुष्कोडी येथे झाला होता.त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनूलाब्दीन अब्दुल कलाम असे होते.त्यांच्या आईचे नाव अशिअम्मा असे होते.अब्दुल कलाम यांचे वडील स्थानिक मशिदीचे इमाम आणि रामेश्वरम येथे येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याचे आणि आणण्याचा व्यवसाय करत होते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम येथे झाले होते.ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.त्यांचे बालपण खूप कष्टात गेले होते.घरी हातभार लावण्यासाठी त्यांनी वर्तमान विकणे अशी अनेक कामे त्यांना करावी लागली.शालेय जीवनात गणित हा त्यांचा आवडता विषय होता.तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी BSC ची पदवी प्राप्त केली होती.तसेच मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून एरॉनॉटिक्स चा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला होता.त्यानंतर 'नासा'येथून त्यांनी एरोस्पेस टेक्नॉलॉजी चे शिक्षणही घेतले होते.

डॉ.एपीजे.अब्दुल कलाम यांचा सन 1958 ते 1963 या 5 वर्षांच्या कालावधीत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)संबंध आला होता.सन 1963 साली ते 'भारतीय अवकाश संशोधन संस्थेत' दाखल झाले होते.त्याकाळी मा.इंदिरा गांधीजी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला होता.डॉ.कलाम यांचा वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर भर होता.त्यांच्यामध्ये आपल्या सहकाऱ्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या विकासासाठी आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यात होती.क्षेपणास्त्र विकासातील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे 'भारताचे मिसाईल मॅन' म्हणून जगभर कौतुक झाले होते.

डॉ.कलाम हे मनाने खूप संवेदनशील आणि साधे होते.लहान मुलांशी गप्पा मारणे हा त्यांचा छंद होता.25 जुलै 2002 रोजी ते भारताचे 11 वे राष्ट्रपती झाले होते.राष्ट्रपती भवनावर आलेले ते प्रथम शास्त्रज्ञ होते.ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.डॉ.कलाम यांच्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण,पद्मविभूषण तसेच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

अशा या महान व्यक्तिमत्वाचे 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे निधन झाले.15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.


◆विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा...धन्यवाद...

No comments:

Post a Comment

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...