Friday, September 2, 2022

शिक्षक दिन भाषण

आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि  येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणास शिक्षक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा. माझे नाव (-----------)आणि मी आपल्यासमोर शिक्षक दिनाविषयी दोन शब्द बोलण्यासाठी उभा आहे.

मित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजेच आपण या दिवशी शिक्षक दिन साजरा करतो.भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मित्रांनो, मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे खूप महत्व आहे कारण शिक्षक म्हणजे एक अशी व्यक्ती जी विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजेडात आणते. ते केवळ पुस्तकी ज्ञान न देता शिक्षणाबरोबरच जीवन कसे जगावे? याचे ज्ञान देखील देतात. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा समुद्र होय असे मला वाटते.चांगले शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात. शिक्षकांशिवाय आपले ज्ञान अपूर्ण आहे. शिक्षक म्हणजे शिल्पकार जो विद्यार्थ्यांना घडवतो, आदर्श समाज निर्माण करतो आणि उद्याचा भारत घडवितो.

मला एवढंच सांगावेसे वाटते की जर आपणास जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करने खूप गरजेचे आहे.

मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद...

No comments:

Post a Comment

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...