◆नमस्कार मित्रांनो,या ब्लॉगमध्ये आपण अभिनंदनपर पत्र कसे लिहावे? याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
सोनाई निवास,
मंगळवारपेठ कोल्हापूर
दिनांक :-
प्रिय मित्र संजय,
कालच तुझे पत्र मिळाले. वाचून खरंच खूप आनंद झाला.राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत धावणे या गटात तू प्रथम क्रमांक मिळवलास याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.
आज हे जे तू यश मिळवलेस ते खरंच खूप महत्वाचे आहे.तुला मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तू घेतलेल्या मेहतन आणि जिद्दीने हे यश तुला मिळालेले आहे.हे यश मिळवून तू तुझ्याबरोबरचं शाळेचे आणि गावाचे नाव मोठे केले आहेस याबद्दल तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहेत.
पुढील वर्षी तू आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील असेच यश संपादन करशील याबद्दल तुला माझ्या मनापासून शुभेच्छा.
तुझा मित्र,
सुनिल
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मित्रांनो, आपले मनापासून धन्यवाद...
No comments:
Post a Comment